Header Ads

Header ADS

महाराष्ट्रातील महिला भाजपा नेत्या मध्यप्रदेश येथून गायब

Maharashtra-woman-BJP-leader-from-Madhya-Pradesh-is-missing-from-here


महाराष्ट्रातील महिला भाजपा नेत्या मध्यप्रदेश येथून गायब 

वृत्तसंस्था जबलपूर -भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान या रहस्यमरीत्या जबलपूरमधून गायब झाल्या. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी त्या बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. पोलिसांची दोन पथके जबलपूरला रवाना झाली आहे. त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान ढाबा मालक व जबलपूरमधील कुख्यात गुन्हेगार पप्पू शाहू हा कुटुंबासह फरार झाला आहे. पोलिसांनी ढाब्यावर काम करणाऱ्या नोकराला शोधून काढले. त्याने 2 ऑगस्टला साहुच्या मारूती वॅगनआर कारची रक्ताने माखलेली डिक्की धुतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. 

    यावरून शाहुने सना खान हीचा घरातच खून केला. नंतर तिचा मृतदेह डिक्कीत ठेवला व धाब्यापासून काही अंतरावरील जबलपूर-दमुआ-कटंगी मार्गावरील हीरन नदीत फेकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 2 ऑगस्टला सर्वत्र मुसळधार पाऊस होता. नद्याही दुथडी भरून वाहात होत्या. पोलिसांनी नदीत मृतदेहाचा शोध घेणे सुरू केले आहे.

  मागील पाच दिवसांपासून जबलपूरमध्ये तळ ठाेकून बसलेले नागपूर पोलिस तपास करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी जबलपूरमधील कुख्यात गुन्हेगार पप्पू शाहू याने खान यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. 1 ऑगस्टला खान या जबलपूरला गेल्या. दोन दिवसांनी संपर्क न झाल्याने त्यांच्या आईने मानकापूर पोलिसांत सना या बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

    पोलिसांची दोन पथके जबलपूरला गेली. पोलिसांनी सना व पप्पूचा शोध घेतला. मात्र, दोघेही आढळून आले नाहीत.जबलपूर पोलिसांच्या मदतीने नागपूर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सनाची हत्या झाल्याची चर्चा आहे. खान या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती मानकापूर पोलिसांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.