राज्यात नवीन राजकीय समीकरणांची चर्चा !राज ठाकरे यांना फोन करण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी
राज्यात नवीन राजकीय समीकरणांची चर्चा !राज ठाकरे यांना फोन करण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी
लेवाजगत न्यूज मुंबई -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पुढाकारामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसे सैनिक या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे बंधू जवळ येण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र या विधानासोबत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे फोन उचलण्यास तयार असतील, तर बोलणार? याचा राजकीय युती किंवा प्रस्ताव असा संबंध जोडू नये. अशीही पुस्ती त्यांनी या वक्तव्यासोबत जोडली आहे.
उद्धव यांच्या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे बोलणे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. राज ठाकरे त्यांचा फोन उचलणार नाहीत, असे त्यांना का वाटते? जे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत, त्यांच्याच मनात ही भीती असू शकते. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा फोन पण राज ठाकरे उचलतात. देशपांडे यांच्या या विधानामुळे ठाकरे आणि राज समर्थक एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी दूरची वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत