Header Ads

Header ADS

वृद्ध दांपत्यास किनगाव येथे मारहाण,भांडण सोडवणाऱ्या तरुणावर ब्लेड ने वार

Old-couple-beaten-up-in-Kingao,-young-man-stabbed-for-arguing-with-a-blade


 वृद्ध दांपत्यास किनगाव येथे मारहाण,भांडण सोडवणाऱ्या तरुणावर ब्लेड ने वार

लेवाजगत यावल -तालुक्यातील किनगाव येथील एकाने गावातील वृद्ध दाम्पत्यास मारहाण केली. ३६ वर्षीय मुलगा भांडण सोडवण्यास आल्यावर ब्लेडने वार करून दुखापत केली. तिघांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

   किनगाव येथील फकीर वाड्यातील रहिवासी रफिक शाह अयुब शाह फकीर याने यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्या घरी आसिफ शाह सादिक शाह फकीर (रा.किनगाव) हा आला. त्याने दारूच्या नशेत रफिक शहा यांच्या वृद्ध आई व वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर रफीक शाह याच्यावर आसिफने ब्लेडने वार केले. डाव्या बाजूला छाती जवळ दुखापत केली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर रफीक शाह याने यावल पोलिसांत फिर्याद दिली. आसिफ शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास हवालदार नरेंद्र बागुले करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.