गणेशोत्सवात पाच दिवस रात्री बारा पर्यंत डीजे वाजवण्यास परवानगी
गणेशोत्सवात पाच दिवस रात्री बारा पर्यंत डीजे वाजवण्यास परवानगी
लेवाजगत न्यूज सावदा- सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास सवलत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. यासह गौरी विसर्जनाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवता येणार आहे. या निर्णयाचे गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. दरम्यान यासंबंधीचे निर्देश शासनाने दिले असल्याचेही सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी सांगितले. १९ सप्टेंबर रोजी गणेशाची स्थापना होणार आहे. यादृष्टीने गणेश मंडळांची तयारी सुरू झालेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत