Header Ads

Header ADS

सना खान खून प्रकरणी मध्यप्रदेशातील कामामुळे आमदाराची चौकशीला दांडी

Sana-Khan-murder-case-due to-work-in-Madhya-Pradesh-MLA-inquiry


सना खान खून प्रकरणी मध्यप्रदेशातील कामामुळे आमदाराची चौकशीला दांडी

वृत्तसंस्था नागपूर- भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हीना खान (वय ३४) हिच्या खुनाप्रकरणी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांनाही नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार आज आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी नागपूर पोलिसांसमोर हजर रहायचे होते. मात्र, संजय शर्मा आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे समजते आहे. मतदारसंघात काही काम असल्याने आज नागपुरात येणे शक्य नसल्याचे संजय शर्मा यांनी नागपूर पोलिसांना कळवल्याची माहिती आहे.

    


 सना खान यांच्याकडे असलेल्या तीनपैकी दोन मोबाइलमध्ये ४ डझनपेक्षा अधिक चित्रफिती आहेत. यात विविध राजकीय पक्षांचे उच्च पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नावांबाबत गुप्तता पाळली आहे. कमलेशला ताब्यात घेतल्यानंतर ही खळबळजनक माहिती मिळाली. या वृत्ताला एका पोलिस अधिकाऱ्याने दुजोरा दिला. दरम्यान, २० दिवस उलटूनही सना यांचा मृतदेह सापडत नसल्याने प्रकरणाचा तपास पुढे जाण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांनाही नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली, अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे. मात्र, मतदारसंघातील कामांचे कारण देत त्यांनी आज चौकशीला येणे टाळले आहे.


     सना अपहरण आणि हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अमित, कमलेश, अमितचा मित्र राजेश सिंग, नोकर जितेंद्र गौड व धमेंद्र यादव या ५ जणांना अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

२ ऑगस्टला सकाळी सना यांची हत्या केल्यानंतर अमितने त्यांच्या पर्समधून काढलेले ३ मोबाइल धर्मेंद्रला दिले. धर्मेंद्रने ते कमलेशकडे सोपवले. धर्मेंद्रच्या अटकेनंतर ही माहिती समोर आली. सोमवारी पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. जबलपूरमधील मंदिराच्या बाजूला विहिरीजवळ १ मोबाइल लपवल्याचे सांगितले. तो मोबाइल पाेलिसांनी जप्त केला. अन्य २ मोबाइल नर्मदा नदीत फेकल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.