सावदा:-सण, उत्सवात सलोखा जपा : राजकुमार शिंदे
सावदा:-सण, उत्सवात सलोखा जपा : राजकुमार शिंदे
लेवाजगत न्यूज सावदा:- प्रत्येक व्यक्तीने आपले सण-उत्सव साजरे करताना कायद्याचे पालन करावे. सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन डीवायएसपी राजकुमार शिंदे यांनी केले. सावदा ठाण्यात परिसरातील पोलिस पाटील, शहरातील शांतता कमिटीचे सदस्य व ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
श्रावणापासून सण व उत्सवांना सुरुवात झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, पोळा, हरतालिका, ऋषिपंचमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद असे हिंदू व मुस्लिमांचे सण लागून आहेत. हे सर्व सण जातीय सलोख्याने, कायद्याचे पालन करून शांततेत साजरे करावे.काही अडचण असल्यास पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी केले.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक फिरोज खान हबीबुल्ला खान, भाजपचे शहराध्यक्ष जे.के. भारंबे, रमाकांत तायडे, अत्तर खान यांनी मनोगत व्यक्त केले. परिसरातील पोलिस पाटील, मुस्लिम प्रार्थना स्थळाचे ट्रस्टी, कुशल जावळे, बाजार समिती संचालक सय्यद अजहर सय्यद तुकडू, अजय भारंबे, दत्तात्रय महाजन, सचिन बऱ्हाटे, गजानन ठोसरे, शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी,अतुल नेहते,जगदीश बढे, श्रीकांत वाणी, शाम अकोले, गणेश माळी, हितेंद्र पाटील, प्रहार पाटींचे तालुकाप्रमुख पिंटू धांडे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत