Header Ads

Header ADS

रोझोदा येथे जागृत कामसिद्ध मंदिरात ४ सप्टेंबरला सामूहिक महारुद्र अभिषेक सोहळा

रोझोदा येथे जागृत कामसिद्ध मंदिरात ४ सप्टेंबरला सामूहिक महारुद्र अभिषेक सोहळा



 रोझोदा येथे जागृत कामसिद्ध मंदिरात ४ सप्टेंबरला सामूहिक महारुद्र अभिषेक सोहळा 


लेवाजगत न्युज सावदा:-येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी महारुद्र अभिषेकाचे आयोजन केले आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र व श्री कामसिद्ध मंदिर संस्थानने केले आहे.



   मागील वर्षी या एक दिवसीय कार्यक्रमात चार हजार भाविकांनी सामूहिक सहभाग घेतला होता. यंदाचा हा कार्यक्रम तिसऱ्या श्रावण सोमवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. या पवित्र महारुद्र पूजेला बसणाऱ्या भाविकांनी सोबत स्वामी समर्थ नित्यसेवा, अभिषेक पात्र, तामण, पाण्याची बाटली, पाट, १०८ बेलपत्र, आसन, चमचा, तांब्याचा तांब्या, शिवलिंग, महामृत्युंजय यंत्र, जपमाळ व हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, अत्तर, कापूर, जानव, शिवमूठ, मूग, भस्म, नारळ इत्यादी घेऊन सकाळी वेळेवर उपस्थित राहावे. हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ केंद्र रोझोदा आणि श्रीराम मंदिर व श्री कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. भाविकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संस्थान व स्वामी समर्थ केंद्राने केले आहे.'

     🙏  श्री स्वामी समर्थ🙏

श्री कामसिध्द महाराज मंदिर रोझोदा ता रावेर येथे दर वर्षी प्रमाणे दि ४ सप्टेंबर तिसरा श्रावणी सोमवार या दिवशी सकाळी १० वाजता भव्य दिव्य महारुद्र अभिषेक सोहळा होणार आहे या वर्षी महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक च्या सेवेसोबत आज पर्यत आपल्या कडून कधी ही सेवा कदाचित झालेली नसेल अशी फार अनुभव  आलेल्या अशा दोन नवीन सेवा सुध्दा होणार आहे 

१) महादेवाच्या पिंडीवर भस्म लेपन विशिष्ट मंत्र  स्तोत्र म्हणून स्वतः आपल्या हातून करण्याची संधी लाभणार आहे या सेवा केलेल्या भस्माचा उपयोग फार मोठा आहे तो त्या दिवशी सेवेच्या वेळी सांगण्यात येईल

2) हरिद्रा लेपन सेवाया सेवेला मुख्यताः ज्या मुलांच्या / मुलींच्या विवाहात अडचणी दूर होण्यासाठी प्रभावी सेवा या सेवेसाठी  उपवर मुले मुलीं उपस्थित असले तर अति चांगले 

 महादेवाच्या पिंडीवर हरिद्रा लेपन ( हळदीचे लेपन ) हे सुद्धा विशिष्ट मंत्र स्तोत्र म्हणून आपण स्वतः करणार आहात महादेवाच्या पिंडीवर हरिद्रा लेपन ची सेवा केलेले तिर्थ आपल्या मुलांचे मुलीचे विवाह तील अडचणी  दूर होवून त्यांचा विवाह हा शीघ्र शीघ्र होतो ( संदर्भ- आदरणीय प्रदीपजी मिश्रा महाराज सिहोरवाले यांच्या अमृतवाणी तील सेवा ) म्हणून आपल्या सर्व भाविकांच्या मागणीनुसार ह्या दोन सेवा या वर्षी रोझोदा कार्यकमात ॲड करण्यात आलेल्या आहेत

ही सेवा चुकवू नये अशी संधी पुन्हा मिळणार नाही

            🙏 श्री स्वामी समर्थ🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.