केळी रावेर तालुक्याचा श्वास - ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य
केळी रावेर तालुक्याचा श्वास - ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य
सावदा येथे पत्रकारांनी केलेल्या सत्कार प्रसंगी वैद्य भावुक
लेवाजगत न्यूज सावदा पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार अनेक विषयांवर पत्रकारिता करीत असतात, क्राईम, अर्थकारण, राजकारण, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर पत्रकारिता केली जाते दैनिक सकाळच्या तत्कालीन संपादकांनी 'केळी हा आपल्या जिल्ह्याचा श्वास आहे, त्यावर कायम लिहीत रहा, सकाळ या विषयासाठी नेहमीच आवश्यक ती जागा उपलब्ध करून देईल असा शब्द दिला आणि मी गेल्या ३२ वर्षापासून केळी उत्पादकांच्या समस्येविषयी लिहीत राहिलो असे मत दैनिक सकाळचे रावेर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य यांनी व्यक्त केले.
त्रिची तामिळनाडू येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान प्रसार प्रिंट मीडिया पुरस्कार मिळाल्याने ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशन तर्फे दिलीप वैद्य यांचा सत्कार शहरातील जाफर लॉन येथे आयोजित छोटे खानी कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री वैद्य म्हणाले की,पत्रकार म्हणून सर्वच विषयांवर बातम्या लिहाव्या लागतात पण त्यातील कुठल्यातरी एका विषयाची सखोल माहिती असावी. केळी विषयक वृत्तलेखन सातत्याने केल्यानेच आपल्याला जागतिक केळी परिषद, दिल्ली आणि इस्राईल येथील जागतिक कृषी प्रदर्शन पाहण्याची व तेथून वृत्तांकन करण्याची संधी मिळाली.या पुरस्काराचे श्रेय केळी उत्पादक शेतकऱ्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, रावेर येथील पत्रकार प्रकाश पाटील, रवी महाजन ,राजेंद्र भारंबे, मिलिंद टोके, कमलाकर पाटील, जितेंद्र कुलकर्णी, जाफर हुसेन हाजी शब्बीर हुसेन उदळी येथील प्रगतिशील शेतकरी ललित पाटील, पंकज पाटील हे उपस्थित होते. यावेळी पत्रकार प्रवीण पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी मानले सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत