Header Ads

Header ADS

अद्याप आरोपी अटक न झाल्याने सावदा पोलिस ठाण्यात संतप्त महिलांचा मोर्चा!

 

The-accused-is-not-arrested-at-the-police-station-the-morcha-of-angry-women!

अद्याप आरोपी अटक न झाल्याने सावदा पोलिस ठाण्यात संतप्त महिलांचा मोर्चा!

प्रतिनिधी सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये गेल्या आठ दिवसांपूर्वी संचालक तथा शाळा समितीचे चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान नराधमाने एका १३ वर्षीय शाळकरी बालिकेचा वाईट हेतूने अतिशय घृणास्पद पद्धतीने विनयभंग केल्याची घटना घडली असून सदर प्रकरणाची वाच्यता होऊ नये यासाठी शर्तीचे प्रयत्न करणारे मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान सह दोन शिक्षकांविरुद्ध पीडित बालिकेच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आज पावतो कोणत्याही आरोपीला अटक झाली नसल्याकारणाने सावदा शहरातील संतप्त महिलेसह पालकांनी आज दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजता शाळेत जावून अशा वृत्तीचे संचालकास संस्थेतून काढण्यात यावे व सदरील मुख्याध्यापकास सेवेतून बडतर्फ करावे.


अन्यथा आमच्या पांल्यांचे दाखले द्यावे,अशी मागणी सुद्धा त्यावेळी लावून धरली होती,तरी झालेला गोंधळ निवडण्याकरिता सावदा पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.त्यानंतर संबंधितांनी चर्चा विनिमय केल्याचे समजते,व त्याच दिवशी महिलांसह पुरुषांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास थेट सावदा पोलीस ठाण्यात मोर्चा नेऊन त्या नराधमांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे अशी एक मुखी मागणी यावेळी मोर्चेकरी महिलांनी सावदा पोलीस ठाण्यात एपीआय जालींदर पळे यांच्याकडे केली.यातून असे दिसून येते की, मोर्चेकरांच्या तीव्र अशा भावना आरोपींना लवकर अटक व्हावी यासाठीच दिसून येत होत्या.

 तरी  घडलेली घटनेची गंभीरता व मोर्चेकरी महिलांच्या उग्र रूप बघून सर्वप्रथम एपीआय जालिंदर पडे यांनी मोर्चेकर्‍यांची भावना ऐकून घेत,संशयित आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसाकडून सुरूच आहे.ती जशी तुमची मुलगी आहे तशी आमची पण मुलगी आहे.अशा गुन्हा करणाऱ्यांना मी अजिबात सोडणार नाही,त्यांना शक्य तितक्या लवकर अटक करण्यात येईल.असे आश्वासन यावेळी मोर्चेकरांना त्यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.