सावद्यात गुरांच्या बाजारात लंपीचा पार्श्वभूमीवर कोणतीही दक्षता नाही
सावद्यात गुरांच्या बाजारात लंपीचा पार्श्वभूमीवर कोणतीही दक्षता नाही
लेवा जगत न्यूज सावदा -लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सात तालुक्यातील गुरांचा बाजार बंद केला आहे. त्यात रावेर तालुक्याचा समावेश नसला तरी रावेर शहरात तीन गुरांना लंपी सदृश्य आजार झालेला आहे. रविवारी सावदा येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा गुरांचा बाजार भरला पण पशुवैद्यकीय दवाखाना असूनही या बाजारात कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना तपासणी किंवा लसीकरण झाले नाही. रावेर बाजार समितीने देखील दुर्लक्ष केले.
जिल्ह्यातील गुरांचा सर्वात मोठा बाजार सावदा येथे रावेर उपबाजार समितीच्या आवारात भरतो.मात्र लंपीच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्टला भरलेल्या बाजारात कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. नेहमीप्रमाणे जिल्ह्यासह शेजारील विदर्भ आणि मध्य प्रदेशातील पशुधन खरेदी विक्रीसाठी अनेक व्यापारी शेतकरी पशुपालक आले होते. दरम्यान मोठ्या संख्येने गुरे बाजारात आणली जात असल्याने लंपीचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाला गुरांची तपासणी किंवा लसीकरणाचे नियोजन करता आले असते. मात्र ही उपाययोजना दूर लंपी प्रतिबंधाची माहिती देण्याची देखील व्यवस्था नव्हती. बाजार समितीने सुद्धा याकडे कानाडोळा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत