सावदा शहरातील तरुण मूर्तिकार आदित्य कस्तुरे घडवतोय शाडू मातीच्या गणेशमूर्ती
सावदा शहरातील तरुण मूर्तिकार आदित्य कस्तुरे घडवतोय शाडू मातीच्या गणेशमूर्ती
लेवाजगत न्यूज सावदा:- लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग सुरु आहे. यानिमित्त मुर्तीकारही बाप्पाच्या मूर्ती घडवण्यात व्यग्र आहेत. येथील श्री स्वामीनारायण मंदिर परिसरातील देवकर वाड्यातील रहिवासी आदित्य दीपक कस्तुरे या तरुण मूर्तीकाराने आकर्षक गणेश मूर्तीची निर्मिती केली आहे. त्याने सहा इंचापासून ते एक सव्वा फुटापर्यंत शाडू मातीच्या आकर्षक मूर्ती घडवल्या आहेत. त्यावर आता रंगकाम केले जात आहे. नागरिकांनी आपल्या घरात शाडू मातीची मूर्ती बसवून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन मूर्तीकार दीपक कस्तुरे याने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत