Header Ads

Header ADS

अध्यात्माचा विश्वचषक -संत राजिन्दर सिंह जी महाराज

 

अध्यात्माचा विश्वचषक
-संत राजिन्दर सिंह जी महाराज

लेवाजगत न्युज:-

धावपटू ज्या प्रकारे विश्वचषकाच्या स्पर्धेची तयारी करतात त्यापासून ही एक बाब स्पष्ट होते की, कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कठोर मेहनत आणि प्रबळ प्रेम भावनेची आवश्यकता असते. आपली तयारी करीत असताना त्यांना या खास गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते की, त्यांना किती वाजता उठायचे आहे, केव्हा झोपायचे आहे, काय खायचे आहे, काय प्यायचे आहे, किती वेळ अभ्यासाला द्यायचा आहे किंवा कोणत्या गोष्टीतून त्यांना प्रेरणा मिळेल? ते आपल्या दिवसाचा प्रत्येक क्षण फार समजून-उमजून व्यतीत करून विश्वचषकाची तयारी करतात.

विश्व भरातील सर्व लोकांना आश्चर्य वाटते की जेव्हा विश्वचषक किंवा ओलंपिक मध्ये विभिन्न खेळाच्या संघाच्या खेळाडूंना क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याकरिता सामना करताना पाहतो की, माणसांना असं वाटतं की माणसाला जे काही हवे असेल ते तो प्राप्त करू शकतो, केवळ या अटीवर की त्याने मनापासून मेहनत केली पाहिजे.

कोणत्याही खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याकरिता त्या खेळाच्या प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली नियमितपणे अभ्यास करावा लागतो. ठीक अशाच प्रकारे आपल्याला अध्यात्मात उन्नती करायची असेल तर आपणासही त्या काळातील पूर्ण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सदाचारी जीवन जगून नियमितपणे ध्यान-अभ्यासाकरिता वेळ दिला पाहिजे. जर असे आपण केले तर आपण निश्चितपणे मानवी जीवनाचे ध्येय जे 'आपण स्वतःला ओळखणे आणि प्रभूला प्राप्त करणे' याच जीवनात प्राप्त करू शकतो.

आपण इतिहासातील त्या महान विभूतींची प्रशंसा करतो, ज्यांनी आपल्या प्रार्थना आणि ध्यान-अभ्यासाद्वारे स्वतःला ओळखले आणि प्रभूला प्राप्त केले. ते असे करू शकले कारण की, जीवन आणि मृत्यू च्या रहस्याला ते सोडवू इच्छित होते आणि हेही जाणण्याची त्यांची इच्छा होती आपण इथे कशाला आलेलो आहोत? आणि आपण हे जीवन संपवल्यावर कुठे जातो?  ते सर्व प्रभू प्राप्तीकरिता पूर्ण समर्पित होते.

जोपर्यंत ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत त्यांनी अनेक वर्षे रात्रंदिवस ध्यान अभ्यासासाठी वेळ व्यतीत केला. आपण सुद्धा अध्यात्मिक जागृती प्राप्त करू शकतो. प्रभूच्या ज्योती आणि श्रुतीचा अभ्यास किंवा शब्द-अभ्यासाचा महत्त्वपूर्ण लाभ असा होतो की, हा अत्यंत कमी अवधीत अध्यात्माचा विश्वचषक प्राप्त करून देतो. म्हणजेच आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी आपण मिलन करू शकतो. नामस्मरण, ध्यान आणि आपल्या अंतरी गुंजणाऱ्या  या नादाला ऐकण्याच्या हा अभ्यास आपल्याला ध्यान केंद्रित करण्याचा साधा व सरळ मार्ग दाखवितो, जो आपणास लवकरात लवकर सफलता प्राप्त करून देतो.

या अभ्यासात आपण आपले लक्ष बाहेरून हटवून दोन  डोळ्यांच्या भ्रुमध्यावर शिवनेत्रावर टिकवितो. हा अभ्यास आपल्या आधुनिक जीवनाला अनुकूल आहे आणि आपण याला अगदी सहजतेने घरी, कार्यस्थळी अथवा जिथे कुठे आपण जातो आणि राहतो तिथे करू शकतो. याकरिता आपण घरदार सोडून जंगलात, डोंगरावर अथवा गुहेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. 


आपण आपल्या संसारिक जबाबदाऱ्या पार पाडताना हा ध्यान-अभ्यास करू शकतो. सायन्स ऑफ स्पिरिच्युऍलिटी सकारात्मक अध्यात्मावर केंद्रित आहे. ज्यामध्ये आपण नैतिक जीवन जगत असताना अधिकाधिक वेळ ध्यान-अभ्यासासाठी देतो, यामुळे आपण शारीरिक, मानसिक अथवा अध्यात्मिकरित्या विकसित होऊ शकतो. जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. जर आपण धावपटुं सारखे जे खेळांमध्ये निपुणता प्राप्त करण्या करिता समर्पित होतात, त्याप्रमाणे आपण सुद्धा त्याच तीव्र इच्छेने आणि दृढतेने आत्म साक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्काराचे आपले ध्येय प्राप्त करण्याकरिता समर्पित झालो तर, आपण निश्चितपणे एक दिवस आध्यात्मिकतेचा विश्वचषक अवश्य प्राप्त करू शकू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.