आमोद्यातील एकाने इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी दोघांवर केली कारवाई
आमोद्यातील एकाने इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी दोघांवर केली कारवाई
लेवाजगत न्यूज आमोदा:- येथील दोन मुलांनी महापुरुषाबाबत टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. आमोदा येथील दोन अल्पवयीन मुलांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून टाकल्याने त्या अल्पवयीन मुलांवर दिनांक १७ रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करून त्यांना बाल सुधारगृहात पाठवले. याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून फैजपूर पोलिसांत एएसआय विजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय एम. जे. शेख, हेकाँ उमेश चौधरी करीत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी त्या पोस्टमध्ये काही सामाजिक तेढ निर्माण होईल असे काही आक्षेपार्य चित्रीकरण नसल्याची खात्री करूनच पोस्ट शेअर ,लाईक किंवा कॉमेंट करावी जेणेकरून समाजात कोणतेही तेढ किंवा वातावरण खराब होणार नाही याची खबरदारी सर्व तरुण तरुणींनी व सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांनी लक्षात घ्यावी असे आवाहन फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी नागरिकांना केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत