धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी घनश्याम राजेंद्र ढोले वर गुन्हा दाखल करण्याची सावदा पोलीस ठाण्यात भाविकांची मागणी
धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी घनश्याम राजेंद्र ढोले वर गुन्हा दाखल करण्याची सावदा पोलीस ठाण्यात भाविकांची मागणी
लेवाजगत न्यूज सावदा- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अमरावती येथील घनश्याम राजेंद्र ढोले याने समर्थवाडी संस्थान आणी विषवस्थावर केलेल्या खोट्या व निराधार आरोपांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सावदा पोलीस स्टेशन येथे भाविकांनी लेखी तक्रारी द्वारे केली आहे.
समर्थ वाडी अमरावती हे धार्मिक संस्थान असून राज्यासह देशभरात ह्या संस्थानचा भाविक वर्ग मोठ्या संख्येने पसरला आहे कोणतेही प्रसिद्धीच्या मागे न लागता संस्थानचे प्रमुख विश्वस्त असलेले ९५वर्षीय पूज्य भाऊसाहेबांनी आपल्या हयातभर योगीराज गोविंद महाराज माकनेर यांनी घालून दिलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरा अविरत सुरू ठेवल्या आहेत. त्याकरिता त्यांनी आपल्या हयातीत अपारश्रम व कष्ट सोसले असून असे पूज्यनिय भाऊसाहेब आमच्यासाठी दैवत असून आमच्या दैवतावर घनश्याम ढोले यासारख्या विकृत मानसिकता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने धांदात खोटे तथा तथ्यहीन आरोप केल्याने आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोचली आहे अशा भावना व्यक्त करत अशा विकृत आणि विघ्न संतोषी व्यक्तीवर आमच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी सावदा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी जगन्नाथ नेमाडे ,विकास पाटील ,किरण नेमाडे ,अशोक नेमाडे, ईश्वर नेमाडे ,चेतन नेमाडे ,महेंद्र नेमाड,े हितेंद्र नेमाडे, सुधाकर माली,प्रभाकर महाजन उपस्थित भाविक मंडळींनी केली आहे .तक्रार देण्यासाठी सावदा परिसरातील भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत