Contact Banner

भुसावळात लिंगायत कोष्टी समाजाचा वधू वर परिचय मेळावा संपन्न


 भुसावळात लिंगायत कोष्टी समाजाचा वधू वर परिचय मेळावा संपन्न


लेवाजगत न्युज भुसावळ:- वर्तमानकाळात मुले व मुली उच्चशिक्षित आहेत.लग्नासाठी त्यांच्या व पालकांच्या खूपच अपेक्षा असतात. मात्र त्या पूर्ण करताना तडजोड आवश्यक असते. बाह्यरुपाला महत्त्व देण्यापेक्षा सारासार विचार केला तरच अनुरूप जोडीदार मिळून उत्तम संसार होणे शक्य असते. 

 मेळावा आयोजनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, त्याचा परिणाम म्हणून समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मेळाव्यात अनेक ऋणानुबंध जुळतील, असा विश्वास लिंगायत कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष रविंद्र कोष्टी यांनी व्यक्त केला.

मेळाव्याचे उद्घाटन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर सेवानिवृत्त अवर सचिव प्रमोद कानडे,आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे, आदर्श शिक्षक गौरवांकित अजय अडिकने, ग्लोबल एचसीएल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख आणि संचालक हेमंत कोष्टी, उपस्थित होते. वधू-वरांना त्यांच्या शिक्षण, वय, आवडनिवड यानुसार पसंती करता यावी, हे लक्षात घेऊन लिंगायत कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने रविवारी (दि.२6) कोळी समाज मंगल कार्यालय भुसावळ येथे भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे यंदाचे हे 4 थे वर्षे होते. . यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता या पदावर निवड झालेल्या ॲङवृशाली उमराणे कोष्टी, बँक ऑफ इंडियाचे एस.डब्लु.ओ सौ. सुषमा तपकिरे,मोहन क्षिरसागर यांचीही उपस्थिती लाभली.

मंडळाचे सचिव राजेश कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे सचिव राजेश कोष्टी ह्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये मंडळाचा लेखाजोखा मांडला तरुण-तरुणींना व्यासपीठावर बोलावून अजय कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मेळाव्यात 98 उपवर मुलांनी व 53 मुलींनी आपला परिचय करून दिला. ज्यांची लग्न जमत नाहीत अशांसाठीच परिचय मेळावे असतात ही मानसिकता आता बदलली आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना युवराज लोणारी यांनी या मेळाव्याचे भरभरून कौतुक केले. मेळावा ही आजच्या काळाची गरज आहे असे संबोधित केले,

राजेंद्र लवणे म्हणाले, की दरवर्षी मेळाव्याला वाढता प्रतिसाद आहे. वधू-वर सूची पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. त्यातून अनेक विवाह जुळतात. प्रमोद कानडे, अजय अडिकने,सुषमा तपकिरे, ॲङवृशाली उमराणे कोष्टी यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरवातीला श्रेयश विनंते,सिध्देश कोष्टी,ईशा घोडके,मिताली कोष्टी,वैष्णवी निराळे, तन्वी घोडके यांनी स्वागत गीत सादर केले.विनयकुमार कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले मान्यवरांचा परिचय सरोज कोष्टी,सोनाली कोष्टी,माधुरी गरुडे,अभिषेक घोडके,दिपक कोंगे यांनी करून दिला.Bhusawalat.lingayat.koshti.samajacha.vadhu.var.parichay.melava.sampann

    माधव गरूडे यांनी आभार मानले मेळावा यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मुकेश कोष्टी,उपाध्यक्ष दिपक कोष्टी,कोषाध्यक्ष दिपक विनंते,सतिष घोडके,संजय खोडके,दिनकर सरोदे,अॅड.सचिन कोष्टी,रविंद्र कोष्टी महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठानचे स्वप्नील कोंगे,अमोल कोष्टी,अविनाश सरोदे,मयुर कानडे अभिजीत साकळीकर आदी युवा कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.मेळावा यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या प्रतिभा घोडके,ज्योती कोष्टी,प्रिती विनंते,वर्षा खोडके,नलिनी कानडे,पल्लवी कोष्टी, प्राची भदाडे, सुनिता विनंते आदी महिला सदस्यांचे सहकार्य लाभले.मेळाव्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुका समितीचे सदस्य व  सावदा येथील कोष्टी युवा मंच याचे विशेष सहकार्य लाभले. या वधू वर परिचय मेळाव्यासाठी मध्यप्रदेश, गुजरात व कर्नाटक या राज्यातून तसेच खानदेशसह, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, सांगली, कोल्हापुर, पुणे व मुंबई विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.