Contact Banner

सावद्यातील १३ वर्षीय बालिकेचा शाळेत विनयभंग केल्याप्रकरणी बंदिवान चेअरमन अक्रमखान अमानुल्लाखान यास जमीन मंजूर..!! सावदा शहरात फिरण्यावर बंदी

13-year-old-girl-from-Savda-in-prison-in-case-of-school-rape-Chairman-Akramkhan-Amanullahkhan-is-granted-land-banned-from-moving-in-Savda-city



सावद्यातील १३ वर्षीय बालिकेचा शाळेत विनयभंग केल्याप्रकरणी बंदिवान चेअरमन अक्रमखान अमानुल्लाखान यास जमीन मंजूर..!!

सावदा शहरात फिरण्यावर बंदी

लेवाजगत न्यूज सावदा:- येथील नाव रुपाला असलेल्या इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल चे संचालक तथा शाळा समिती विद्यमान चेअरमन "अक्रम खान अमानुल्ला" खान (वय ४८ )यांनी १३ वर्षीय शाळकरी बालिकेचा शाळेत वाईट हेतूने अतिशय घृणास्पद व कीळसवानी पद्धतीने विनयभंग केल्याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

 या प्रकरणी अटक करण्यात आली असता  तो १४ ऑगस्ट २०२३ पासून जिल्हा कारागृहात चार महिन्या पासून बंदिवान असताना जमीन मिळावा म्हणून त्यांनी भुसावळ सत्र न्यायालयात दोनदा जामीन मिळावा म्हणून विनंती अर्ज सादर केले होता. 

 परंतु तेथे जामीन कोर्टाने नाकारल्यामुळे अखेर त्यानी जामीन मिळावा म्हणून संभाजीनगर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

 सदर जामीन अर्जावर दि.११/१२/२०२३ रोजी उच्च न्यायालयात शेवटची सुनावणी झाली. आरोपीचे वकील व फिर्यादीचे वकील यांनी आपापल्या पद्धतीने युक्तिवाद केला. परिणामी त्याच दिवशी पोस्को अंतर्गत दाखल गुन्ह्याचा"निकाल लागेपर्यंत अक्रम खान अमानुल्ला या संशयित आरोपीने सावदा गावात जाऊ नये"या अटीवर संभाजी नगर  उच्च न्यायालयाने अखेर त्याचा जामीन मंजूर केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.