Contact Banner

मंडल अधिकारी कार्यालयात पूर्वीप्रमाणे प्रतिज्ञापत्र साक्षांकित व्हावे बेटी बचाव बेटी पढाव च्या संयोजिका सारिका चव्हाण यांची रावेर तहसीलदारांकडे मागणी

 

Affidavit-to-be-attested-in-the-office-of-the-mandal-officer-as-before-request-to-the-tehsildars-of-the-coordinator-of-Sarika-Chavan

मंडल अधिकारी कार्यालयात पूर्वीप्रमाणे प्रतिज्ञापत्र साक्षांकित व्हावे बेटी बचाव बेटी पढाव च्या संयोजिका सारिका चव्हाण यांची रावेर तहसीलदारांकडे मागणी

लेवाजगत न्यूज रावेर-ग्रामविकास मंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश भाऊ महाजन व खा रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व बेटी बचाव बेटी पढाओ अभियान अंतर्गत रावेर तहसीलदार यांना आज दुपारी निवेदन देण्यात आले.

विघ्नहर्ता सुपर शॉप,स्वामी हॉस्पिटल शेजारी सुगंगा नगर रोड फैजपूर रोड सावदा

         

        बेटी बचाव बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण यांनी रावेर तालुक्यातील सात  मंडळ मध्ये मंडळ अधिकारी यांना जे अधिकार होते ते अधिकार चार पाच वर्षे पासून काढण्यात आले आहे. तरी ते अधिकार त्यांना ताबडतोब देण्यात यावे जेणेकरून तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास कमी होऊन सर्व सामान्य जनतेचा पैसा,वेळ व मनस्ताप कमी होईल संजय गांधी निराधार योजना, शेतकरी बांधव तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रतीज्ञापत्र,जातीचे दाखले,व अनेक इतर कागदपत्रे सादर करावी लागतात त्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं ,हे काम आधी सेतुच्या माध्यमातून होत होते पण काही दिवसांपासून वकीलांन मार्फत या विषयानसाठी नोटरी करावी लागत आहे. त्याचा खर्च व वेळ हा सामान्य नागरिकांना परवडत नाही व जनसामान्यांच्या अडचणीत वाढ होते. तरी तहसीलदार याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आपण या सामन्यात जनतेचे पालक आहात आपण हा अधिकार जर तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना  दिला तर जनसामान्यांच्या अडचणीत दुर होतील अशी विनंती जळगाव जिल्हा अध्यक्ष ( पूर्व ) अमोल जावळे व बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण यांनी रावेर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्याप्रसंगी किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेशजी धनके, जिल्हा अध्यक्ष महीला मोर्चा सौ रंजना ताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरीलाल कोळी जिल्हा चिटणीस राजन लासुरकर, रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी , सुनिल पाटील, पंचायत समिती सभापती कविताताई कोळी, जिल्हा चिटणीस रेखाताई बोंडे,यावल तालुका महिला आघाडी अध्यक्षा जयश्री चौधरी वासुदेव नरवाडे, दिपाली झोपे, नितीन पाटील, किसान मोर्चा रावेर तालुका अध्यक्ष राहुल महाजन, पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.