Contact Banner

खांबावर कार धडकल्याने रावेरातील पन्नास वर्षीय विवाहितेचा मृत्यू, नशिराबाद जवळील घटना

50-year-old-married-woman-death-from-Ravera-incident-near-Nashirabad-by-car-hitting-pillar


खांबावर कार धडकल्याने रावेरातील पन्नास वर्षीय विवाहितेचा मृत्यू, नशिराबाद जवळील घटना

लेवाजगत न्यूज जळगाव : भरधाव कार खांबावर धडकून झालेल्या अपघातात रावेरातील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, २ डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्यानजीक घडला. सावित्री सुनील हसकर वय ५०( रा. रावेर) असे मयत विवाहितेचे नाव असून या अपघातात तिण जण जखमी झाले. हा अपघात कार खांबावर धडकल्याने झाला.  

50-year-old-married-woman-death-from-Ravera-incident-near-Nashirabad-by-car-hitting-pillar


अपघात स्थळावरील  माहितीनुसार, पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर (रा. रावेर) यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. शुक्रवारी उपचार घेऊन रात्री नाशिक येथून रावेरला त्यांच्यासह कुटूंबातील सदस्य कारने परतत असताना नशिराबाद टोलनाक्यानजीक एका खांबावर कार धडकली. या अपघातात सावित्री हसकर या जागीच ठार झाल्या तसेच चालकाचा हात व पाय फॅक्चर झाला आहे तर अन्य दोघांनाही मार लागला. मयत विवाहितेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.