Contact Banner

धावत्या रेल्वेतून पडल्याने निवृत्त शिपायी रतन भालेराव यांचा मृत्यू

Retired soldier Ratan Bhalerao dies after falling from running train


धावत्या रेल्वेतून पडल्याने निवृत्त शिपायी रतन भालेराव यांचा मृत्यू 

 लेवाजगत न्यूज -रावेर येथील तहसील कार्यालयातील सेवा निवृत्त शिपाई रतन राजाराम भालेराव (वय ६२) आर जी एम कॉलनी रावेर यांचा येथील रेल्वे स्टेशनजवळ रावेरकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेची बातमी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मनमिळावू असलेल्या भालेराव यांनी तहसील कार्यालयात काम करताना सर्वांशी प्रेमाचे संबंध निर्माण केले होते. अनेकांना या घटनेने धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Retired soldier Ratan Bhalerao dies after falling from running train


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.