बदलापूर येथे बामणोंद वासियांचे स्नेहसंमेलन निसर्गरम्य अश्या दुबे फॉर्म हाऊस येथे उत्साहात
बदलापूर येथे बामणोंद वासियांचे स्नेहसंमेलन निसर्गरम्य अश्या दुबे फॉर्म हाऊस येथे उत्साहात
लेवाजगत न्यूज ठाणे-नोकरी धंदा निमित्ताने आपले मूळगाव सोडुन ठाना मुंबई, उपनगर परिसर मध्ये स्थायिक झालेले बामणोंदकर रहिवाशी लेवा पाटीदार एकता संघ, ठाणें, मुंबई, नवी मुंबई, पालघर जिल्हा परिसर चे स्नेह संमेलन शेकडो कुटुंबांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात बदलापूर येथील निसर्गरम्य अश्या दुबे फॉर्म हाऊस येथे खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्यात आले.
सदर प्रसंगी ,खान्देश कन्या लेवा पाटीदार समाज भूषण, निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिन निमीत्त त्यांना तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले,प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते , खान्देश सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.नितीन जावळे आणि युवा समाजसेवक, अन्नदान चळवळ चे श्री.कुशल नेहेते यांचा सत्कार मूर्ती म्हणुन सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला ,, शून्यातून विश्व निर्माण केलेल्या ठाणे मुंबई, मिरा रोड च्या आदर्श उद्योजिका.सौ. दिपाली तळेले यांच्या कडून लकी ड्रॉ जोडी करिता महिलांना आकर्षक अशी पैठणी व पुरुषांना ड्रेस देण्यात आला, लहान मुले, मुली, तसेच महिलांकरीता विवीध सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते, श्री.जयंत झांबरे यांचे कडून व इतर मान्यवर यांचे कडून दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अशोक महाजन यांचे कडून कु.वेदांत भिरुड ह्या विद्यार्थी मित्रास गंगाई पुरस्कार देण्यात आले, तसेच खान्देश मधील लग्न समारंभ आणि इतर समारंभात होणारा पान सुपारी चा रीवाज आताच्या पिढीला माहिती होण्यासाठी श्री.शशिकांत झांबरे, व श्री.ललित झांबरे यांच्या कडून विशेष आयोजन करण्यात आले होते,, बहीणाबाई चौधरी यांचा स्मृति दीन निमित्ताने लेवा गणबोली दीन साजरा करण्यात आला. कवियित्री बहीणाबाई चौधरी यांचे कवितांचे वाचन व ऐतिहासिक माहिती महिला सभासदांनी दिली.
कार्यक्रम प्रसंगी बोलतांना खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीन जावळे यांनी सांगितले की आपल्या बामणोंद गावचे सुंदर असे भव्य दिव्य बामणोंद भवन व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे,,कार्यक्रम चे शेवटी श्री.अशोक महाजन यांचे कडून तुरीच्या डाळीचे वरण,बट्टी बाफ्ले,वांग्याची भाजी, वरण भात, कढी , मिरची असा खमंग मेनू अन्नदान म्हणुन ठेवण्यात आला होता,,कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे चे उद्योगपती श्री.कमलाकर झांबरे, मुरबाड चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री विश्वनाथ तळेले उपस्थित होते,, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सन्माननीय सन्माननीय पदाधिकारी श्री विजय झांबरे, श्री गोविंदा वाघुळदे, श्री ओंकार बोंडे, लिलाधर वाघुळदे, श्री. सुनील गुळवे, विकास फिरके यांनी विशेष परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत