भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा लोकसभा संयोजकपदी स्वप्नील पाटील
भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा लोकसभा संयोजकपदी स्वप्नील पाटील
शिर्डी : भाजप कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र स्वीकारताना स्वप्नील पाटील. शेजारी विक्रम नागर व पदाधिकारी
लेवाजगत न्युज पारोळा : येथील स्वप्नील भगवान पाटील यांची भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा जळगाव लोकसभा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. शिर्डी येथे झालेल्या कामगार मोर्चाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. विविध क्षेत्रातील संघटित, असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त श्रमिकांना भाजपमध्ये सामील करण्यासाठी व भारतीय जनता पक्षाचे विचार व ध्येयधोरण कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नूतन संयोजक स्वप्नील भगवान पाटील यांनी दिली.
या वेळी भाजप कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम नागरे व भाजप कामगार मोर्चा विभाग सरचिटणीस महेश पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत स्वप्नील पाटील यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून स्वप्नील पाटील हे कामगारांच्या प्रती करीत असलेले कार्य पाहता त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील, संघटन मंत्री सचिन पानपाटील, भाजप जळगाव सरचिटणीस राधेश्याम चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत