पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी बॅंकिंग, फ़ायनान्स आणि इन्श्युरन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच केंद्र सरकारची विविध संस्थांशी भागीदारी
पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी
बॅंकिंग, फ़ायनान्स आणि इन्श्युरन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच केंद्र सरकारची विविध संस्थांशी भागीदारी
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर ) : पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे एनएसडीसी, एआयसीटीई आणि बजाज फ़िन्सर्व यांच्या सहकार्याने दोन करार करण्यात आले. या करारांतर्गत रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आर्थिक सेवा क्षेत्रामधील रोजगार संधींकरिता तरूण पदवीधर मुलं बॅकिंग, फ़ायनान्स आणि इन्श्युरन्स सर्टिफ़िकेट प्रोग्राम अंतर्गत तयार होतील, या भागीदारीमुळे आर्थिक क्षेत्रामध्ये क्षमता निर्मीतीसह तरूणांना आर्थिक क्षेत्रातील डिजिटल माध्यमांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये सहभागी होण्याकरता भक्कम पद्धतीने तयार केले जाणार आहे.
याबाबत बजाजचे संजीव बजाज म्हणाले की, “ आमची एनएसडीसी आणि शिक्षण मंत्रालयाशी झालेली भागीदारी ही आम्हाला तरूण वर्गामध्ये बदल घडवून आणण्यात मदत करेल ज्याकरिता त्यांना उत्तम कौशल्यासह अगिणित असे यशाचे दरवाजे देखील खुले होतील. यामुळे आर्थिक विकासासह एकत्रित कामाची संधी भविष्यात उपलब्ध होणार आहे, आणि कौशल भारत, कुशल भारत हे वाक्य खरे करून दाखविले जाईल. देशातील प्रमुख कौशल्य विकासाचे स्त्रोत असलेल्या एआयसीटीई( शिक्षण मंत्रालय अंतर्गत) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयांतर्गत) ,द्वारे भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण अशा आर्थिक सेवा समूह असलेल्या,बजाज फ़िन्सर्व सोबत एकत्र येऊन पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. करारामुळे, बॅंकिंग, आर्थिक आणि इन्स्युरन्स प्रमाणपत्र कार्यक्रम कौशल्य विकासाचा, १०० तासांचा एक अभ्यासक्रम विकसित केला आहे ज्याच्या माध्यमातून २० हजार उमेदवार तयार केले जातील , या अभ्यासक्रमाची निर्मीती ही उद्योग तज्ञ, प्रशिक्षण भागीदार, शैक्षणिक संस्था आणि मानसशास्त्रीय आरोग्य संस्थांचा मदतीने करण्यात आलेली आहे. सध्या सुमारे ३५० पेक्षा अधिक महाविद्यालयात २३ राज्य, १०० जिल्हे आणि १६० पेक्षा अधिक गावांमधून कार्यरत आहे. यांचा हेतू हा कौशल्य, शिक्षण आणि तरूण पदवीधर आणि एमबीएचा विद्यार्थ्यांमध्ये नेमका आत्मविश्वास निर्माण करण्याचा आहे, विशेषत: २ आणि ३ टियर शहरांमध्ये. असे केल्याने रोजगार क्षमता निर्माण होत असतानाच आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये दीर्घकालीन कामाचा टिकावा लागावा म्हणून योग्य ते निर्णय देखील ते घेऊ शकतील.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत