फैजपुर येथे धनाजी नाना चौधरी यांची ७१ वी पुण्यतिथी निमित्त आदरांजली
फैजपुर येथे धनाजी नाना चौधरी यांची ७१ वी पुण्यतिथी निमित्त आदरांजली
लेवाजगत न्यूज फैजपुर:-येथील धनाजी नाना महाविद्यालयांच्या प्रांगणात थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांची ७१ वी पुण्यतिथी उत्साहात साजरा करण्यात आली, प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
आदरांजली प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, चेअरमन मा.लीलाधर शेठ चौधरी, प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे, उप प्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, डॉ. व्ही. सी.बोरोले, प्राचार्य डॉ.आर.एल. चौधरी, प्राचार्य डॉ.आर.वाय.चौधरी, डॉ.जगदीश पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारोती जाधव यांनी तर आभार प्रा. शेरसिंग पाडवी यांनी मानले, तसेच श्री.शेखर महाजन, सिद्धार्थ तायडे यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत