Contact Banner

श्रीराम अक्षता कलश यात्रा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता निघणार सावदा शहरातून

श्रीराम अक्षता कलश यात्रा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता निघणार सावदा शहरातून


श्रीराम अक्षता कलश यात्रा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता निघणार सावदा शहरातून

लेवाजगत न्यूज सावदा- शहरात अयोध्या येथून आलेल्या श्रीराम अक्षदा कलश यात्रेची शहराच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा निघणार आहे. या यात्रेत सर्व तरुण-तरुणी,आबालृद्ध नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .ही शोभायात्रा   शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजता दुर्गा माता मंदिरापासून निघेल तरी या शोभायात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन समिती च्या वतीने संपूर्ण शहरात फिरून समिती तर्फे करण्यात आले आहे.

श्रीराम अक्षता कलश यात्रा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता निघणार सावदा शहरातून




   दिनांक २२ जानेवारी २०२४  सोमवार  रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे  होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण तमाम भारतीयांना देण्यासाठी दिनांक १ जानेवारी  ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान विशेष संपर्क अभियान देशभरात राबविण्यात येणार आहे .त्याचे आमंत्रण प्रित्यर्थ  घरोघरी जाऊन अक्षदा वाटप करण्यासाठी अयोध्येतून अक्षदा घेऊन अक्षता मंगल कलश शहरात  दाखल झालेला आहे. या अक्षता मंगल कलशाची शोभायात्रा शहरातून  शनिवार दिनांक  ३० डिसेंबर २०२३ रोजीदुपारी साडे तीन वाजता दुर्गा माता मंदिरा पासून  काढण्यात येणार आहे. 

 शोभायात्रा  दुर्गामाता मंदिर ,इंदिरा गांधी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक,गांधी चौक,गवत बाजार,रविवार पेठ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,वंजार वाडी,मोठा आड, महावीर चौक मार्गे शहराच्या प्रमुख मार्गावर शोभायात्रा  फिरणार आहे.शोभयात्रेचा समारोप  दुर्गा माता मंदिराजवळ  होईल. शोभायात्रेत तमाम रामभक्त अबालवृद्ध, युवक व महिला यांनी सहभागी होऊन ३५० वर्षातून श्रीराम लल्लाचे मंदिर निर्माण होत असल्याने सर्व नागरिक भक्तांनी आपापल्या परीने हा उत्सव साजरा करून या नवीन वर्षाची दिवाळी दिनांक   २२ जानेवारी २०२४ रोजी साजरी करावी असे आवाहन सावदा येथिल श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा लोकोत्सव समितीचे जे. के. भारंबे व अभय वारके यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.