धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात एड्स सप्ताह निमित्त जनजागृती
धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात एड्स सप्ताह निमित्त जनजागृती
लेवाजगत न्यूज फैजपूर -तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक एड्स सप्ताह निमित्त वकृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय चे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, एड्स हा एक अतिशय भयानक असा आजार असून त्यावर कोणताही उपचार वा औषध नाही. या रोगामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असते. हा रोग इम्यूनो -डेफिशियनसीमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने असुरक्षित यौवन संबंधामुळे, बाधित व्यक्तीचे रक्त घेतल्याने , आईकडून स्तनपान करणाऱ्या बाळाला अशा अनेक कारणांमुळे हा रोग होऊ शकतो. त्यामुळे समाजामध्ये जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.
या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आर्यन किशोर कोळी, द्वितीय क्रमांक भूमिका रणजीत परदेशी, तर तृतीय क्रमांक कशिश दीपक गलवाडे यांचा आला. रांगोळी स्पर्धेत प्रथम गायत्री चौधरी द्वितीय क्रमांक गौरवी महाजन हिने पटकावला. वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक भूमिका रणजीत परदेशी तर द्वितीय क्रमांक कशिश दीपक गलवाडे व तृतीय क्रमांक आर्यन किशोर कोळी या विद्यार्थ्यांनी मिळवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .बी.वाघुळदे तसेच सर्व उपप्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शेवटी आभार प्रा. तिलोत्तमा चौधरी यांनी मानले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अर्चना वराडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत