राजस्थान गौरव सन्मानाने डॉक्टर रवींद्रजी भोळे महाराज होणार सन्मानित
राजस्थान गौरव सन्मानाने डॉक्टर रवींद्रजी भोळे महाराज होणार सन्मानित
लेवाजगत न्यूज उरुळी कांचन जि. पुणे: जोधपूर राजस्थान येथील सारथी युथ फाऊंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल देण्यात येणारा राजस्थान गौरव सन्मान जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ह भ प डॉ. रवींद्रजी भोळे यांना या वर्षीचा राजस्थान गौरव पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेला आहे. स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा समारंभ मान्यवरांच्या हस्ते चोवीस डिसेंबर रोजी रविवारी ग्रीनलँड रिसॉर्ट चोपासानी जोधपूर येथे होणार आहे. डॉ.रवींद्र भोळे यांनी कोरोना महामारी मध्ये उरुळी कांचन परिसरामध्ये रात्रंदिवस डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र द्वारे वैद्यकीय सेवा दिलेली आहे.
गरजवंत रुग्णांना फ्री ऑफ कॉस्ट औषधोपचार केलेले आहेत. त्याचप्रमाणे परप्रांतीयांना गावाला जाण्यासाठी सर्टिफिकेट दिलेले आहेत. गरजवंत व्यक्तींना अन्नधान्यांचे वाटपही केलेले आहे. त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. आजही डॉ. रवींद्र भोळे हे दुर्लक्षित,वंचित घटकांसाठी कार्यरत आहेत. वरील राजस्थान गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांची अभिनंदन केलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत