धनाजी नाना चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'कौशल्य विकास सप्ताह' चे आयोजन
धनाजी नाना चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'कौशल्य विकास सप्ताह' चे आयोजन
लेवाजगत न्यूज फैजपूर : धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथे दिनांक २२ ते २८ यादरम्यान धनाजी नाना चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त 'कौशल्य विकास सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले.
यानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जागतिक गणित दिवस, वकृत्व स्पर्धा, विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी CET व NEET या विषयावर मार्गदर्शन तसेच कला व वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान लेखी परीक्षा, धनाजी नाना चौधरी यांच्या जीवनावर आधारित लघुपट तसेच वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्याने व फन फेअर इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह दरम्यान श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या मनातून गणिताची भीती काढून टाकली पाहिजे, रामानुजन हे थोर गणित तज्ञ होते, ते आपल्या भारतात जन्माला आले, हे आपले भाग्य आहे. तसेच रामानुजन यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये गणितीय विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
सप्ताहाच्या निमित्ताने वकृत्व व सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात वकृत्व स्पर्धेचा विषय राष्ट्रीय सभेचे पहिले ग्रामीण अधिवेशन हा होता. तसेच विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक मार्गदर्शन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यासाठी डॉ.आर.एन केसूर व डॉ.निखिल वायकोळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपाला बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना डायरी व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समरोप समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ.एस व्ही जाधव यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट केलेच पाहिजे असेही ते म्हणाले. प्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास बोरोले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उत्पल चौधरी यांनी विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा.दिलीप बोदडे यांनी व आभार प्रा.भारती कुंभार यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत