चेंबूर येथील पंचरत्न मित्रमंडळाला समता साहित्यिक अकॅडमीचा मदर टेरेसा पुरस्कार प्रदान
चेंबूर येथील पंचरत्न मित्रमंडळाला समता साहित्यिक अकॅडमीचा मदर टेरेसा पुरस्कार प्रदान
उरण (सुनिल ठाकूर )दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी समता साहित्य अकॅडमी तर्फे पंचरत्न मित्र मंडळला या वर्षामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून गरजूंना योग्य प्रकारे साहित्याचे वाटप केले . अशी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. या माध्यमातून यांना मदर टेरेसा नॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
डॉ .शिरोडकर स्मारक सभागृह परेल या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, समता साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. डी .एस.तांडेकर,डॉ. स्नेहा देशपांडे, अभिनेते अर्जुन यादव प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी पाहुण्यांच्या हस्ते पंचरत्न मित्रमंडळाच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले .या पुरस्कार व दिन दर्शिके च्या उद्घाटन सोहळ्याला पंचरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय अशोक भोईर, पंचरत्न मित्रमंडळाचे सचिव प्रदीप गावंड तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत