Contact Banner

सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुल येथे बाल विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना भगवा ध्वज, पाच पणती व कापसाच्या वात वाटप

Distribution of saffron-flag,-five-granddaughters-and-cotton-wicks to the-students-on-the-birthday-of-a-child-student-at-Savada-Yethil-Swaminarayan-Gurukul-


सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुल येथे बाल विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना भगवा ध्वज, पाच पणती व कापसाच्या वात वाटप 

लेवाजगत न्यूज सावदा-येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल मध्ये बाल १ चा वर्गात शिक्षण घेत असलेला चि. जतिन अक्षय सरोदे या विद्यार्थ्याचा जन्मदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला साजरा. 

         


 अयोध्या येथील मंदिरात  २२ जानेवारी   २०२४ रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा होत आहे. समाजात या सोहळ्याचा निमित्ताने अतिशय उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचेच निमित्त साधून  चि. जतीन च्या वडील अक्षय सुभाष सरोदे याचा मनात एक कल्पना आली. मुलाचा वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुकुल मध्ये शिकत असलेल्या नर्सरी, ज्युनिअर , सिनियर के जी चा सर्व विद्यार्थ्यांना भगवा ध्वज, पाच पणती व कापसाच्या वात ह्या वाटप करण्यात आले. या प्रसंगी गुरुकुल चे प्राचार्य श्री संजय वाघुळदे सर होले मॅडम , मनीषा मॅडम ह्यांचा उपस्थिती कार्यक्रम अतिशय उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.