सावदा पालिका संचलीत हायस्कूल मध्ये शिक्षक पालक संघाच्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व परीक्षेबाबत चर्चा
सावदा पालिका संचलीत हायस्कूल मध्ये शिक्षक पालक संघाच्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व परीक्षेबाबत चर्चा
लेवाजगत न्यूज सावदा - येथील पालिका संचलित श्री.आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची शिक्षक -पालक संघाची सदस्य ची सभा नुकतीच पार पडली. या सभेत उपस्थित पालक व शिक्षक यांनी मधल्या सुट्टीतून विद्यार्थी संख्या कमी उपस्थिती असल्याचे व येणाऱ्या पूर्व परीक्षा व बोर्ड परीक्षा यांच्यावर समविचार चर्चा झाली. यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे व उपाध्यक्ष प्रकाश भंगाळे व कल्पना ठोसरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
लवकरच दहावी व बारावीची पूर्व परीक्षा होणार असल्याने या परीक्षेला सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना बोर्डाची सराव होण्यासाठी उपस्थिती पूर्ण राहावी यासाठी पालकांनीही आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करावे व बोर्ड परीक्षेमध्ये जास्त जास्त गुण मिळण्यासाठी या परीक्षेत उपस्थिती द्यावी असे आवाहन शिक्षकांनी पालकांना केले. यावेळी पालकांनी हे विद्यार्थ्यांची मधल्या सुट्टीतील उपस्थिती कमी का असते. याबाबत प्रश्न उपस्थित केला व त्यावरही शिक्षक आणि पालक यांच्यात चर्चा झाली व त्यानुसार इयत्ता पाचवी पासून बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल द्वारे उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी कॉल करून त्यांना माहिती द्यावी की आपला पाल्य उपस्थित राहत नाही. असे समविचारी शिक्षक पालका संघात चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक शिक्षक पालक संघाचे सदस्य श्यामकांत पाटील, श्रीकांत वाणी संध्या चौधरी, कल्पना शिरसाट, अरुण राठोड, शरद देवळे, चंद्रकांत चौधरी, परीक्षेत वाणी, जानकीराम पाटील, अतुल सपकाळे इत्यादी शिक्षक व पालक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत