व्हाईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी चिनावल येथील मिलिंद टोके यांची निवड समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे:सुरेश उज्जैनवाल
व्हाईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी चिनावल येथील मिलिंद टोके यांची निवड
समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे:सुरेश उज्जैनवाल
( विघ्नहर्ता सुपर शॉप,स्वामी हॉस्पिटल शेजारी सुगंगा नगर रोड फैजपूर रोड सावदा)
लेवाजगत न्यूज सावदा-:पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.त्यामुळे लोकांच्या समस्या मांडण्याची आणि त्या सोडवण्याची आणि लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी पत्रकार यांच्यावरती आहे.आपण ज्या समाजासाठी काम करतो त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे असे प्रतिपादन वाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी भुसावळ येथे आयोजित व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हास्तरीय बैठकीत केले .यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी,संजयसिंग चव्हाण,व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षा उज्वला बागुल,शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी,व्हॉइस ऑफ मीडियाचे सचिव सुनील आराक, नाना पाटील,प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
व्हाईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलिंद टोके यांची नियुक्ती झाल्याचे पत्र यावेळी देण्यात आले. यावेळी टोके यांचा सत्कार करण्यात आला. उज्जैनवाल म्हणाले की ज्यावेळी पत्रकारां वर वाईट परिस्थिती येते त्यावेळी त्यांना कोणीही मदत करत नाही हे पत्रकाराचं दुर्दैव म्हणावे लागेल.
पत्रकाराने कोणासाठी काम करावे जर आमच्या वाईट काळामध्ये ज्या लोकांची आम्ही वर्षांनुवर्षे सेवा केली ते लोक जर आमचे अश्रू पुसायलाही येत नसतील तर आम्ही कशासाठी पत्रकारिता करावी.या गोष्टी लक्षात घेऊन आपण एक संघ राहिले पाहिजे पत्रकारिता ही एक प्रतिभा आहे. सर्वच पत्रकार चांगले आहेत आपण समाजासाठी काम करतो त्या समाजाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा व आपणही आपले संघटन मजबूत करावे असेही उज्जैनवाल यांनी यावेळी सांगितले आहे.
बारामती येथे ग. दि. माडगूळकर सभागृहात १८ते २० नोव्हेंबर दरम्यान व्हाईस ऑफ मीडियाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पत्रकारांच्या हिताचे १४ ठराव पारित करण्यात आले आहे. त्याचे वाचन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मिनीटोके यांनी केले.त्या अनुषंगाने पत्रकारांचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयात ९ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाउपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संजयसिंग चव्हाण,श्रीकांत जोशी,प्रवीण पाटील,उज्वला बागुल यांनी आपले विचार व्यक्त केले.या बैठकीसाठी,शाकीर मलिक, राजेंद्र भागवत भारंबे,समीर तडवी, अनोमदर्शी तायडे,श्याम पाटील,वासुदेव सरोदे,प्रवीण पाटील,योगेश सोनवणे ,पंकज युवराज पाटील,अनिल भागवत मानकरे,युसुफ शब्बीर खाटीक,सुरेश महाले,संदीप वैष्णव,रवींद्र मराठे,अमोल अमोदकर, मनोहर लोणे,विजय वाघ, सुनील आराक,शेख कलीम शेख हुसेन, राहुल वानखेडे,कालूशाह शहा,संजय बाळकृष्ण,काशीव विनोद बापूराव गोरधे, निरंजना तायडे,जितेंद्र कुलकर्णी,हबीब चव्हाण,गोपाल रमेश म्यांद्रे आदी रावेर,यावल,सावदा,फैजपूर,बोदवड,येथील पञकार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत