ग्रामपंचायतीचा मासिक सभेत ठराव गावात मृत्यू झाल्यास चिनावल ग्रा. पं. देणार मोफत पाणी टँकर खुर्च्या व मंडप
ग्रामपंचायतीचा मासिक सभेत ठराव
गावात मृत्यू झाल्यास चिनावल ग्रा. पं. देणार मोफत पाणी टँकर खुर्च्या व मंडप
लेवाजगत न्यूज चिनावल- निवडणुकीनंतर चिनावल (ता. रावेर) ग्रामपंचायतीची महापरिनिर्वाण दिनी पहिलीच मासिक सभा झाली. त्यात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार गावांतील कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या घरासमोर मंडप, द्वारसभेसाठी येणाऱ्या लोकांसाठी खुर्ची, ग्रा.पं.तर्फे मोफत पाण्याचे टँकर देण्याचा ठराव लोकनियुक्त सरपंचांनी मांडला. त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.
चिनावल ग्रामपंचायतीत महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सरपंच ज्योती भालेराव यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यानंतर झालेल्या मासिक सभेत गावात कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या घरी मोफत पाण्याचे टँकर, बसण्यासाठी व खुर्च्या, घरासमोर मंडप ग्रामपंचायतीकडून पुरवण्याचा ठराव सरपंचांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच शाहीनबी शे.जाबीर,सदस्य चंद्रकांत भंगाळे, ठकसेन पाटील, प्रियंका बोरोले, यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामसेवक के. आर. भगत उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत