फैजपुरात संत जगन्नाथ महाराज पुण्यतिथी उत्सवाचे १० ते १३ डिसेंबरपर्यंत भव्य आयोजन
फैजपुरात संत जगन्नाथ महाराज पुण्यतिथी उत्सवाचे १० ते १३ डिसेंबरपर्यंत भव्य आयोजन
लेवाजगत न्यूज फैजपूर-महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे गुरु ब्रह्मलिन संत जगन्नाथ महाराज यांचा २२वा पुण्यतिथी सोहळा १० ते १३ डिसेंबरदरम्यान आयोजित केला आहे. यानिमित्त शहरातील मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत 'अमृतवाणी सत्संगा'चे आयोजन केले आहे.
तीन दिवस पुण्यतिथी उत्सवात सकाळी सायंकाळी हरिपाठ होईल. सद्गुरु गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था नायगव्हाणचे २०० विद्यार्थी व अध्यक्ष रविंद्र महाराज महाले, अ.भा.संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री मंडलेश्वर राधे राधे बाबा, वृंदावन धाम आश्रमाचे गादीपती गोपालचैतन्य महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, आचार्य सुरेश राज मानेकर महाराज शास्त्री,शास्त्री भक्ती किशोर दासजी,स्वरूपानंद महाराज, शास्त्री भक्ती किशोर दासजी, शकुंतला दिदी, पवनदास महाराज, प्रवीण महाराज, महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील सतपंथ मुखी परिवाराची वैधानिक. १३ डिसेंबरला २ ते ४ दरम्यान ब्रह्मलिन संत गुरुदेव जगन्नाथ महाराज पुण्यतिथी महापूजा मंदिरात होईल. १४ डिसेंबर रोजी ७ शोभायात्रा निघेल. सकाळी ९ वाजता समाधिस्थळी पादुका पूजन, सकाळी १० ते १ धर्मसभा, १ ते ४ महाप्रसाद समाधिस्थळी मंदिराच्या शेतात होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत