काळभैरव जयंती थोरगव्हाण येथे हजारो भाविकांचे उपस्थितीत साजरी श्री स्वामीसमर्थ सेवेकऱ्यांनी केले सामूहिक भैरवचंडीचे वाचन
काळभैरव जयंती थोरगव्हाण येथे हजारो भाविकांचे उपस्थितीत साजरी
श्री स्वामीसमर्थ सेवेकऱ्यांनी केले सामूहिक भैरवचंडीचे वाचन
लेवाजगत न्यूज सावदा-दरवर्षीप्रमाणे रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे प्रसिद्ध असलेल्या श्री कालभैरवनाथ महाराजांच्या जयंतीनिमित्त सवाद्य सकाळी दाग दागिन्यांनी सजवलेल्या मुकुट मिरवणूक काढण्यात आली दुपारी १ वाजता स्वामी समर्थ सेवेकऱ्यांमार्फत सामूहिक भैरवचंडी पाठाचे वाचन शेकडो भाविकांनी केले.
हा व्हिडीओ बघा-थोरगव्हाण येथे काळभैरवनाथ जयंती निमित्त मुकुटाची जल्लोषात निघाली मिरवणूक,हजारो भाविकांनी घेतले दर्शन
मंदिरात मंगळवार रोजी सकाळी सात वाजता चावडीवर मुकुट आणून दाग दागिन्यांनी मुकुट सजविण्यात आला त्यानंतर सकाळी दहा वाजता गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक गावातून प्रदक्षिणा मारून मंदिरात पोलीस पाटील अरविंद झोपे यांचे हस्ते श्री कालभैरव नाथ महाराजांच्या बाण्याला मुकुट चढवून पूजन करण्यात आले.
(विघ्नहर्ता सुपर शॉप फैजपूर रोड,सुगंगा नगर टी पॉईंट जवळ सावदा )त्यानंतर गावातील व परिसरातील हजारो भाविक दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिरात पूजेचा मान पोलिस पाटील यांना असतो...यावर्षी महाप्रसाद जळगाव येथील तारा दालमिल चे प्रो.सुरेंद्र शेठ,निर्मल शेठ,निलेश शेठ यांचे कडून होता,मुकुट प्रमोद रोटे घेतात,,,मिरवणुकी वेळी..ट्रस्ट अध्यक्ष महेश झोपे.बाळू कोल्हे. गावचे पोलिस पाटील अरविंद झोपे,हर्षल पाटील, नितीन चौधरी,सतीश चौधरी,रोशन बाऊस्कर,राजू नाले,महेश बाऊस्कर,मुकेश कोल्हे,सिद्धू पाटील,राजू बाऊस्कर,विजू शिंदे,पंकज चौधरी,राजू चौधरी, गोलू चौधरी,हितेश चौधरी,विशाल पाटील,भूषण पाटील,पिंटू चौधरी,कृणाल राणे,पिंटू पाटील, रामा माळी,समाधान कोळी,चेतन चौधरी,राजू फकिरा,प्रदीप पाटील,अरुण बाऊस्कर,नारायण कोलते,दिपक(माँटी )चौधरी,तुषार महाजन,अरुण माळी,अजय झोपे, तसेच ट्रस्ट चे सर्व सदस्य व मंदिराचे सेवेकरी,भाविक भक्त गण उपस्थित होते.तुषार चौधरी,प्रणय चौधरी,देवेश पाटील,मयूर चौधरी हे नियमित आरती करतात.
स्वामी समर्थ सेवेकऱ्यांमार्फत सामूहिक भैरव चंडीचे दुपारी एक वाजता सोहळ्याचे आयोजन


कोणत्याही टिप्पण्या नाहीत