Contact Banner

पुण्यात स्थायिक चिनावलकरांचा स्नेहमेळावा विविध कला गुणांनी साजरा

Chinawalkar-settlers-friendship-meeting-celebrated-with-various-arts-in-pune


पुण्यात स्थायिक चिनावलकरांचा स्नेहमेळावा विविध कला गुणांनी साजरा

लेवाजगत न्यूज पुणे- दिनांक ३ डिसेंबर २३ रोजी रविवार  विठ्ठल रूक्मिणी मंदिर निगडी प्राधिकरण या ठिकाणी संपन्न झाला. मिळाव्याची सुरुवात श्री ज्ञानदेव नारखेडे सर, श्री बी. टी. बेंडाळे सर, श्री हेमचंद्र भिरूड सर, आणि डॉ पुरूषोत्तम पाटील यांनी दिप प्रज्वलन करून झाली. नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आरती टोके यांनी त्यांच्या खास शैलीत सांभाळली. नंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी जमलेल्या तरूण समुदायास आपापल्या शैलीत मार्गदर्शन केले. महत्त्वाचे म्हणजे चिराग भंगाळे आणि टीम यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन खूप छान रीतीने केले. कार्यक्रमातील भाषण संपल्यावर चिनावलच्या जूनिअर कलाकारांनी आपल्या विविध प्रकारच्या त्यात डान्स, नाटक, कराटे, अशा विविध कला प्रदर्शित केल्या.  नंतर आपल्या गावची खासियत फौजदारी डाळीचं जेवण श्री राकेश भंगाळे, श्री तुषार कोल्हे आणि मित्रांनी मिळून तयार केले. जेवणाचा मेन्यू खूपच छान होता फौजदारी डाळ (उळदाची डाळ) आणि गोडाचा पदार्थ बुंदी, जिरा राईस विशेष म्हणजे केळीच्या पानावर जेवण होते. आणि सर्वांनी मिळून जेवणावर मनसोक्त ताव मारला.    






    जेवणाच्या पंगती संपल्यावर चिनावलच्या महिलांनी मिळून संगीत खुर्ची आणि तळ्यात मळ्यात हा खेळ अती उत्साहाने सहभागी होऊन खेळला हे आजचे खास वैशिष्ट्य होतं.

   आज खरंच खूप छान वाटतं होतं की चिनावलचे पुणेकर एकमेकांना अगदी आनंदाने भेटत होते आणि आपापसात ओळख करून घेत होते. जेणेकरून पुढील काळात काही अडचणीच्या वेळी एकमेकांच्या कामात आलं पाहिजे. जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे चिनावलकर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खूपच आनंदाचे छण होते आजचे.

   शेवटी आपल्या चिनावलच्या छोट्या छोट्या बालकलाकारांना छानसे गिफ्ट देऊन त्यांना पण कार्यक्रमाचा एक हिस्सा म्हणून समजाऊन घेतलं आणि ती टीम सुद्धा आज खूपच खुश दिसून आली. कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडावा यासाठी प्रत्येक चिनावलकर आपापल्या परीने हातभार लावत होते. अगदी कोणालाही काही सुचना करायची वेळ आली नाही. आणि पुढील कार्यक्रम कसा करायचा याचे सुद्धा नियोजन करण्यात आले. अशाप्रकारे आजच्या गोड कार्यक्रमाची सांगता गृप फोटो काढून झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.