करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
उरण (सुनिल ठाकूर )करंजायेथिल द्रोणागिरी हायस्कूल मराठी व सेमी इंग्रजी माध्यम येथे शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उरण तालुका विधी समिती व उरण तालुका वकील संघटना यांचे विद्यमानेकायदे विषयी मर्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिबिरात पोस्को, एडस् ग्राहक हक्क व त्याचा कायदा इत्यादी विविध विषयांवर माहिती देण्यात आली.
सदर शिबिरास बार असोसिएशन उरणचे अध्यक्ष ऍड.डी.व्ही.नवाळे साहेब,ऍड.पराग म्हात्रे.ऍड.रोहन म्हात्रे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कायद्या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे चेअरमन सीताराम नाखवा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा म्हात्रे मॅडम,शिक्षक वर्ग उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत