Contact Banner

तासखेडा येथे संत सदगुरू तुकाराम बाबांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

तासखेडा येथे संत सदगुरू तुकाराम बाबांची पुण्यतिथी उत्साहात साजरी


तासखेडा येथे संत सदगुरू तुकाराम बाबांची पुण्यतिथी उत्साहात साजरी 

तासखेडा ता. रावेर (लेवाजगत प्रतिनिधी )येथे सालाबादप्रमाणे संत सदगरु आध्यात्मिक गुरुवर्य तुकाराम बाबा यांची पूण्यतिथी दिं १६ रोजी मोठ्या थायमाटात साजरी करण्यात आली .




     याबाबत सविस्तर असे की संत तुकाराम बाबा हे जामनेर तालुक्यातील चिंचखेडा(तपन ) येथील सदगुरु भगवानबाबा यांचे परम शिष्य होते . त्यांनी समाधी घेतल्यानंतर तासखेडा  येथील  तुकाराम बाबा हे आध्यात्मीक क्षेत्राचे गाढे अभ्यासक होते . एवढेच नव्हे तर भगवान बाबांचे आवडते शिष्य असल्याने सर्व गुरु बंधुमध्ये वरीष्ठ होते त्यांना सर्वानुमते बाबांच्या आज्ञेवरून गादीपती म्हणुन त्यांची वर्णी लागली होती . ते चिंचखेडा मठाचे मठाधीपती होते सर्व गुरुबंधू व शिष्यांना त्यांनी अनेक लिला सुद्धा करून दाखविल्या व सर्वाना आपल्या परंपरेचे ज्ञान बोध देतच राहीले . त्यांनी त्यांच्या मुळ तासखेडा येथे शेवटचा श्वासघेतला .त्यांची सुध्दा समाधी त्यांच्या शिष्यांनी स्वखर्चाने बांधुन त्यांच्या मंदीराचे पूर्ण काम केले . त्यांच्या पुण्य तिथीचा कार्यक्रम त्यांनीच सुरु केला .आजरोजी सुद्धा कानसवाडा ,प्रिंप्री, यावल, भोलाने, जामनेर, चिंचखेडा ,मांगी ,लिधूर, तासखेडा येथील भाविक पालखी सोहळा व पुण्यतिथी साजरी करत आहे . त्यांच्या समाधीचे काम पूर्ण झाले असुन बाहेर गावहून येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणुन तुकाराम बाबांचे पुतणे सुनिल रामदास पाटील व त्यांचे भाऊ यांनी भक्तनिवास आणि सभामंडपा साठी जागा दान केली आणी त्यांच्या शुभहस्ते कुदळी मारून उद्‌घाटन केले .त्या वेळेस बाबांच्या परिवारातील त्यांची मुलगी कामीना बाई ,जावाई वसंत पाटील तसेच सुभाष गिरधर पाटील, कैलास पाटील, समाधान पाटील, निवृत्ती पाटील, चंद्रकात पाटील व शिष्य गण उपस्थीत होते .

         या सोहळ्यात दिनांक १५ रोजी रात्रभर संगीतमय ब्रम्हानंदी भजनाचा कार्यक्रम त्यांच्या शिष्य मंडळीनी साजरा केला . सकाळी सर्व गावातील ग्रामदेवताची पुजा करण्यात आली नंतर समाधी स्थळावर पुजा अर्चा करून गर्जना आरती झाली . तेथुन संपूर्ण पणे गावातुन त्यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली . त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . बाहेर गावहून आलेल्या सर्व भाविक भक्त शिष्य गण व गुरु बंधु चे बाबांच्या परिवारातील सदस्यांनी  तसेच तासखेड्यातील त्यांचे गुरुबंधु गोरखनाथ दिना कोळी, अनिल कोळी, गणु कोळी व महीला मंडळ  यांनी व ग्रामस्थांनी त्यांची पुजा करून आभार व्यक्त केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.