मध्य रेल्वे, महाव्यवस्थापक श्री.राम करण यादव यांच्याशी भुसावळ रेल्वे विभागात विविध विकास कामांबाबत, खासदार रक्षाताई खडसे यांनी साधला संवाद
मध्य रेल्वे, महाव्यवस्थापक श्री.राम करण यादव यांच्याशी भुसावळ रेल्वे विभागात विविध विकास कामांबाबत, खासदार रक्षाताई खडसे यांनी साधला संवाद
लेवाजगत न्युज भुसावळ:-
मध्य रेल्वे महाव्यवस्थापक श्री.राम करण यादव हे आज भुसावळ रेल्वे विभाग दौऱ्यावर आले असता त्यांनी विभागातील विविध स्टेशन येथे भेट देऊन विकास कामे व दैनंदिन कामकाज बाबत पाहणी केली असता, डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार श्री.संजयजी सावकारे यांच्यासह त्यांची भेट घेऊन रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विषयक विविध विषयांवर संवाद साधून, कामे तत्काळ मार्गी लावणे विषयी मागणी केली.
यावेळी रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, वरणगांव, भुसावळ, निंभोरा, सावदा व रावेर येथे विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे, केळी पट्यातील शेतकऱ्यांसाठी मालवाहू वॅगन वाढविणे, सदर स्टेशनवर प्रवाश्यांना चांगल्या सुविधा मिळणेसाठी उपाय योजना करणे, रावेर लोकसभा क्षेत्रात प्रगती पथावर असलेल्या आरओबी, आरयुबी (उड्डाणपूल व भुयारी मार्ग) यांच्या कामात गती देणे, तसेच पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज महामार्गच्या प्रगती बाबत संवाद साधून, योग्यत्या सूचना केल्या तसेच रेल्वे विषयक विविध कामांबाबत निवेदन दिले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह आमदार श्री.संजयजी सावकारे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक श्री.राम करण यादव, मध्य रेल्वे भुसावळ विभागीय व्यवस्थापक श्रीमती ईती पांडे व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत