नागपुरात लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू
नागपुरात लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्युज नागपूर:-लग्नाच्या वऱ्हाडाचा अपघात होऊन सहाजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर येथील काटोल मार्गावरील सोनखाब ताराबोळी शिवारात लगत कॉलिस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला, ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण कोमात गेल्याची माहिती आहे. रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल धोटे, अजय चिखले, वैभव चिखले, मयुर इंगळे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश ढोणे हा कोमात आहे. हे सर्व राहणार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या गांव मेडेपठार गावातील आहेत.
जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलाच्या लग्नाला जाऊन गावी परत येताना मेंढेपठार शिवारता काटोलकडून नागपूरला जाणाऱ्या माल वाहून ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात जागीच सहा जणांचा मृत्यू झाला. तर एकाला नागपूर येथे रुग्णालय दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे,
काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत