अखंडत्वाचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
अखंडत्वाचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
लेवाजगत न्यूज जळगांव - एकता से बडी कोई जनशक्ती नही या ब्रिद वाक्याचे गोमंतक लेवा समाजाचेच नव्हे तर अवघ्या देशाला वंदनीय असणारे भारतीय समाजकारण राजकारणातील एक प्रभावशाली अनुकरण प्रिय व्यक्तीमत्व आपल्या अजोड शैलीने स्वतंत्र भरतातील ५०० च्या वर संस्थान खालसा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. अशा थोर देशभक्त व अखंड भारताचे प्रथम उपपंतप्रधान, गृहमंत्री भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे जळगांव विभाग, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था व अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
३१ ऑक्टोबर १८७५ ते १५ डिसेंबर १९५० या ७५ वर्षाच्या अभुतपूर्व जीवन प्रवासात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची ऐतिहासिक घटनाक्रमाची नोंद इतिहासात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जीवनामध्ये अविरत कष्ट केले व भारतीय स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी वकील व्यवसायात ख्याती मिळवून समाजकारण व राजकारणात अमीट मुद्रा उमटवली ही भुषणावह बाब असल्याचे मान्यवरांनी संबोधले. लेवा भवन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे केंद्रिय अध्यक्ष तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ. स्नेहल फेगडे, प्रकाश वराडे, डॉ.प्रशांत वारके, ज्योतीताई महाजन, नीला ताई चौधरी, ॲड. ज्योती भोळे, मधुकर भंगाळे, राजेश वारके, भूषण चौधरी, स्वप्निल रडे, प्रशांत पाटील, प्रा. योगेश महाजन विशाल काळे, चंद्रकांत चौधरी, गोलू लोखंडे, अजित चौधरी, गणेश लोडते, देवेंद्र चौधरी, सचिन पाटील, चेतन पाटील, एकनाथ पाचपांडे, विवेक महाजन, अमित जगताप, दिलीप नारखेडे, गुंजन खडके, राजेश काळे, ॲड. नेमीचंद येवले वसंत सोनवणे, गणेश वाणी, योगेश अत्तरदे, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, विजय नारखेडे, सचिन महाजन, भूषण भोळे आदी पंचक्रोशीतील ग्रामीण भागातुन विविध युवकांची उपस्थिती होती



कोणत्याही टिप्पण्या नाहीत