Contact Banner

पारस काव्य कला जनजागृती संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

 

Paras-poetry-art-public-awareness-organization-state-level- award-ceremony-concluded

पारस काव्य कला जनजागृती संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.)सानपाडा,नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-२०२३चे आयोजन  करण्यात आले होते. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ऐंशी गुणवंतांचा ह्यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले .

Paras-poetry-art-public-awareness-organization-state-level- award-ceremony-concluded


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सिंधू बांडे (समाजसेविका ), श्री.गणेश सलवदे (मुख्याध्यापक ),श्री.संजय बर्वे  (प्रसिध्द लेखक -नागपूर ) हे व्यासपीठावर होते.आगरी कवितांचे बादशाह श्री.पुंडलिक म्हात्रे यांनी  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

पुरस्कार सोहळ्याचे हे तेरावे वर्ष होते. श्री.पुंडलिक म्हात्रे यांना विश्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सुप्रसिध्द निवेदक प्रा.शंकर गोपाळे यांना सर्वोत्कृष्ठ निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी  महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून दोनशेहून अधिक  कवी-कवयित्रींनी  सहभाग घेतला होता.प्रथम तीन क्रमांकाच्या कवींना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन,सेक्टर-१०,सानपाडा, नवी मुंबई येथे संपन्न झाला  

पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.)सानपाडा चे संस्थापक अध्यक्ष श्री.मंगेश चांदिवडे आणि आयोजिका सौ.शोभा चांदिवडे यांनी अत्यंत नेटके आयोजन केले होते. श्री.शंकर गोपाळे यांनी आपल्या काव्यात्मक शैलीतून आणि गोड वाणीतून सदर कार्यक्रमाचे निवेदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.