शांतीची सुरवात प्रत्येक माणसापासून होते : प्रेम रावत
शांतीची सुरवात प्रत्येक माणसापासून होते : प्रेम रावत
लेवाजगत न्यूज नवी दिल्ली ३ डिसेंबर : विश्व प्रसिद्ध शिक्षक, उच्चतम विक्रीच्या पुस्तकांचे लेखक आणि मानवतावादी श्री प्रेम रावत यांनी, राज विद्या केंद्र, छत्तरपुर-दिल्ली इथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एक लाखांपेक्षा अधिक लोकांना शांतीचा संदेश दिला. या कार्यक्रमाला दिल्लीच्या स्थानिक लोकांशिवाय जवळच्या अनेक राज्यातून लोक आले होते. त्याचप्रमाणे स्थानीय मीडिया, विद्यार्थी आणि समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ति तसेच परदेशाततुन आलेले अतिथि सामील झाले होते.
शांति सर्व माणसांची मूलभूत गरज आहे. या कार्यक्रमात प्रेम यांनी ‘स्वतःला जाणून घेण्याचे’ महत्व यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ते इथे जटिल गोष्टी सोप्या करण्यासाठी आहेत. जीवनात सर्व गोष्टींच्या दोन वेगवेगळ्या प्रकृती असतात – एक, जी तुम्हाला स्वतःच्या जवळ आणते आणि दुसरी, जी तुम्हाला स्वतःपासून दूर नेते. त्यांनी श्रोत्यांना प्रश्न विचारला की, “तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची संख्या अधिक आहे? ती-जी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जवळ आणते की, ती-जी तुम्हाला स्वतःपासून दूर नेते.” प्रेम यांनी या गोष्टीवर भर दिला की, आपल्या जीवनात आपण त्या गोष्टींना महत्व दिले पाहिजे, ज्या आपल्याला स्वतःच्या जवळ आणण्यास मदत करतात. त्याने आपल्या जीवनात शांति व आनंद येईल.
प्रेम यांच्या मतानुसार शांति एक अशी गोष्ट आहे जिचा अनुभव प्रत्येक माणसाने आपल्या हृदयात घेतला पाहिज. ज्या शांतीचा आपण शोध घेत आहोत ती आपल्या अंतरात आहे आणि आपण ती प्राप्त करू शकतो. हा गहन परंतु सोपा संदेश उपस्थित श्रोत्यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकला. लाखो लोकांनी शांति संदेश लक्षपूर्वक ऐकणे आणि या शांतिच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकणे, हे बघणे निश्चितच एक अप्रतिम दृश्य होते.
२ एप्रिल २०२३ रोजी लखनौ इथे, प्रेम रावत यांनी ‘एका लेखकाने पुस्तक वाचणे’ या कार्यक्रमात भाग घेणार्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त श्रोत्यांच्या उपस्थितीचा विश्व विक्रम केला आहे. त्या कार्यक्रमास १,१४,७०४ लोकांनी प्रेम यांचे, न्यूयॉर्क टाइम्सचे सर्वात जास्त विक्री होणारे ‘हिअर यूवरसेल्फ’ या पुस्तकाची हिंदी आवृत्ती ‘स्वयं की आवाज’ हे पुस्तक, ते वाचत असताना ऐकले. नवी दिल्ली येथील या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रेम रावत यांना हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स, इंडियाचे संपादक सचिन शर्मा यांनी कौतुक प्रमाणपत्राने सन्मानित केले. त्यांच्या पुस्तकांनी फक्त भारतातच एक वर्षापेक्षा कमी कालावधीत १,२५,००० पेक्षा अधिक पुस्तकांच्या विक्रीचा आकडा पार केला आहे म्हणून हे प्रमाणपत्र देण्यात आले.
२६ नोव्हेंबर २०२३ रोजी बोधगया इथे, प्रेम रावत यांनी एका कार्यक्रमात लोकांना संबोधित केले, ज्यात ३,७५,६०३ लोकांनी भाग घेतला, ज्यामध्ये ‘एका वक्त्याला ऐकण्यासाठी जमलेली सर्वाधिक उपस्थिती’ हा नवा विश्व विक्रम बनविला. अशा रीतीने प्रेम रावत यांनी एका वर्षाच्या आत दोन ग्रीनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविले.
अधिक महितीसाठी वेब साईट
1. www.premrawat.com
2. www.rajvidyakender.org



कोणत्याही टिप्पण्या नाहीत