रायपुर ग्रामपंचायत सरपंच पदी लताबाई भोई यांची वर्णी
रायपुर ग्रामपंचायत सरपंच पदी लताबाई भोई यांची वर्णी
लेवाजगत न्यूज तासखेडा-रायपूर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी लताबाई दिलीप भोई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.रायपुर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पॅनल प्रमुख वि.वी.सो गहुखेडा चेअरमन श्री हेमराज पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ७ जागे साठी मतदान झाले. सात जागेपैकी ५ जागेवर श्री हेमराज पाटील यांच्या पॅनलचे वर्चस्व दिसून आले या विजयाचे सर्व गावकरी तसेच माजी सरपंच श्रेय श्री.रुपेश युवराज पाटील यांना जाते सर्वत्र रुपेश पाटील यांच कौतुक केले जात आहे.
निवडून आलेले सदस्य सौ संगीता निवृत्ती पाटील ,सौ मंडाबाई विश्वनाथ तायडे, श्री प्रकाश लक्ष्मण पाटील आणि श्री अनिल कडू तायडे या निकाला देण्यासाठी सावदा मंडळ अधिकारी श्री प्रवीण वानखेडे ,रायपुर तलाठी श्री श्रीहरी कांबळे व सुरेश बोरनारे आणि ग्रामसेवक विनायक पाटील उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत