Contact Banner

रोझोदा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न २११ नागरिकांची तपासणी


 रोझोदा गावात मोफत आरोग्य शिबीर संपन्न २११ नागरिकांची तपासणी

लेवाजगत न्युज रोझोदा:- रोझोदा गावात बऱ्हाणपूर येथिल ऑल इज वेल  मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल , ग्रामपंचायत रोझोदा, अनुलोम सामाजिक संस्था व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.त्या शिबिरात एकूण २११ नागरिक रुग्णांनी आपले नाव नोंदवून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. 



   ऑल इज वेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे आलेल्या डॉक्टर्स यांनी  रुग्णाची मोफत तपासणी केली. तपासणीसत्यांच्या संपूर्ण स्टाफ ने सहकार्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशदादा महाजन, सरपंच श्री पुष्कर फेगडे, उपसरपंच श्री चेतन  भारंबे, सदस्य श्री नारायण विष्णू राणे, श्री खिलचंद सुपडू धांडे, श्री निखिल सुभाष सरोदे, श्री गिरीश कमलाकर पाटील, सौ. प्रियंका पुष्कर फेगडे, सौ. भावना अमोल धांडे, सौ पूजा मयूर कोल्हे, सौ फरजाना जुम्मा तडवी, सौ आम्रपाली रवींद्र मेढे, सौ सुनीता गणेश कोळी, प्रतिष्ठित  ग्रामस्थ, अनुलोम भाग जनसेवक व ग्रामपंचायत संपूर्ण कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.