गाते येथे गजानन बाबांचा पालखी सोहळ्यात भाविकाची अलोट गर्दी
गाते येथे गजानन बाबांचा पालखी सोहळ्यात भाविकाची अलोट गर्दी
तासखेडा ता.रावेर .. (प्रतिनिधी ) सावदा येथुन जवळच असलेल्या गाते येथील संत सदगुरू गजानन महाराज मंदीरापासुनदिनांक १४रोजी सालाबादप्रमाणे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थीतीत साजरा करण्यात आला . सर्व प्रथम मंदीरातील सर्वस्थापीत देवी देवतांची ब्राम्हण वृंदांच्या मंत्र उपचाराने पुजा होम यज्ञ करण्यात आले. त्यानंतर वैकुंठवाशी बाबुजी महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक करव्यात आला . त्यानंतर बाबांच्या आईंच्या आदेशाने संपूर्ण गावातुन गजानन बाबांची पालखीची मिरवणुक काढण्यात आली. सोबत सदगुरु बाबुजी बाबांची मुर्ती (प्रतिमा ) सोहळ्यात भाविकाच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पालखी सोहळात बाबाची कमतरता भासत असल्याने भाविकांचे डोळे भरून येत होते. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील दिंड्या, ढोल ताशे, बॅन्ड यांच्या सुमधूर स्वरांनी गणगण गणात बोते च्या जयघोषत संपूर्ण गाते नगरी जणु शेगांव भासत होती . या सोहळ्यासाठी नाशीक, पुणे ,मुंबई ,विदर्भ, गुजरात येथुन शेकडो भाविक दर्शनासाठी आले होते .गावातुन प्रत्येकोनी आपल्या घरासमोर सडा सारवणकरून रांगोळी काढुन गाव सुशोभित करण्यात गावकऱ्यांनी उत्साह दाखवला.
रांगोळ्या काढुन रांगोळ्या घालुन परम संत सदगुरू गजानन बाबाचा व संत बाबुजी बाबाचा फोटेची सुंदर आरास तयार केली होती.
पालखी सोहळ्या संपल्यावर उपस्थीतसर्व भाविक भक्तांनी महाप्रसादचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदीराचे विस्वस्त तसेच दुर्वांकुर मंडळ ग्रामस्थ व परिसरातील भाविकानी अथक परिश्रम घेतले .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत