Contact Banner

जळगाव शहरात तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ

 

Suspicious-body-of-youth-found-in-Jalgaon-city-excited

Suspicious-body-of-youth-found-in-Jalgaon-city-excited




जळगाव शहरात तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ 

लेवाजगत न्यूज जळगांव- शहरातील मोहाडी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एका तरूणाचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत तरूणाला रात्री अज्ञातांनी मारहाण केल्याचा त्याचा मृत्यू झाला असे बोलले जात आहे. दरम्यान गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन सुधाकर दुसाने वय-३४ रा. नित्यानंद नगर, मोहाडी रोड, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

    याबाबत अधिक असे की, पवन दुसाने हा तरूण आपल्या आईवडीलांसह मोहाडीरोडवरील नित्यानंद नगरात वास्तव्याला आहे. हातमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्याचा मृतदेह मोहाडी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला रात्री अज्ञात व्यक्तीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असे परिसरात बोलले जात होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातपाठवण्यात  आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.