"स्वामी"ची ज्येष्ठ नागरिकांकरिता "भव्य गायन स्पर्धा"
"स्वामी"ची ज्येष्ठ नागरिकांकरिता "भव्य गायन स्पर्धा"
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "स्वामी" सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्वायर्नमेंट संस्थेने ज्येष्ठ नागरिकांकरीता "विरंगुळा" नावाने उपक्रम ७ वर्षापूर्वी चालू केला. त्या उपक्रमातर्फे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांकरिता "भव्य गायन स्पर्धा" आयोजित केली आहे.
सदर स्पर्धा मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत भावसार हॉल, परमार गुरुजी मार्ग, परळ, मुंबई ४०० ०१२ येथे आयोजित केली आहे. विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिस देण्यात येणार आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दि. ३० डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीकरिता :- प्रदिप ढगे ९९२०७८२६५२ आणि विमल माळोदे ९८६७५८५५५३ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजन प्रमुख मोहन कटारे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत