Contact Banner

मोठी बातमी: डेहराडूनमध्ये वायू गळती, श्वास घ्यायला त्रास, अनेकजण बेशुद्ध पडले


 मोठी बातमी: डेहराडूनमध्ये वायू गळती, श्वास घ्यायला त्रास, अनेकजण बेशुद्ध पडले


लेवाजगत न्युज डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये मंगळवारी पहाटे एक दुर्घटना घडली. येथील झाझरा परिसरात क्लोरीन वायू गळतीमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर झाझरा परिसरातील चंदन नगर परिसर निर्मनुष्य करण्यात आला. वायू गळतीमुळे अनेक लोक बेशुद्ध झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायू गळतीमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आजूबाजूच्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. डेहराडूनचे एसएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, तेथून वायू गळती होणारा सिलेंडरही काढला जात आहे. परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी खड्डा खणून हे सिलेंडर त्यात पुरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रेमनगर पोलिस ठाण्यांतर्गत झाझरा परिसरात एका मोकळ्या भूखंडात हे गॅस सिलिंडर ठेवले होते, त्यातून अचानक वायू गळती सुरू झाली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली.


न्यूज एजन्सी एएनआयने वायू गळती थांबवण्यासाठी कार्य करत असलेल्या पथकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हे पथक क्लोरिनचे सिलिंडर जमिनीत गाडण्याचं काम करत आहे जेणेकरुन वायू गळतीवर नियंत्रण मिळवता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.