५९ व्या क्रीडा महोत्सवानिमित्त "नवजवानचा" आवाज घुमणार
५९ व्या क्रीडा महोत्सवानिमित्त "नवजवानचा" आवाज घुमणार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नवजवान सेवा मंडळाची स्थापना १९६५ साली जिजामातानगर, काळाचौकी येथे झाली. सामाजिक भान जपत अनेक उपक्रम राबवत असतानाच युवकांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्याने करत आहेत. यंदा मंडळाचा ५९ वा क्रीडा महोत्सव साजरा होत आहे. हिरक महोत्सवाकडे वाटचाल करत असतानाचा यंदाही मंडळाने परिसरातल्या आबालवृद्धांना सामावून घेण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे भव्य स्तरावर आयोजन केले आहे.
१४ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 'ब'-गटाचे कबड्डी सामने सायं. ७ वाजता आयोजित करण्यात आले आहेत.
१८ जानेवारी २०२४ श्री स्वामी समर्थांच्या 'पादूका पूजना'चा सोहळा सायं. ६ वा. षोडशोपचार पूजा करून साजरा केला जाणार आहे
२० ते २१ जानेवारी २०२४ आंतर जिजामातानगर "बॉक्स अंडर-आर्म क्रिकेट स्पर्धा २०२४" चे भव्य आयोजन केले आहे. स्पर्धा सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.
विभागातील बालगोपाळांना सामावून घेण्यासाठी २३ जानेवारी २०२४ रोजी 'बाल महोत्सवा'चे आयोजन सायं. ६:.३० पासून केले आहे.
गुरुवार दि. २५ जानेवारी २०२४ रोजी नागरिक रहिवाशी सेवा संघ (रजि.) यांच्यातर्फे 'श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे' आयोजन करण्यात आले आहे.
तरीही विभागातील सर्व नागरिकांनी ह्या क्रीडा महोत्सवानिमित्त मंडळाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती नवजावन क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष अमित वाडकर, सरचिटणीस अजिंक्य बेचावडे, खजिनदार विश्वास (भाऊ) बेचावडे आणि नागरीक रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी आणि सरचिटणीस दिगंबर घाडिगांवकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत