Contact Banner

कोचुरला श्री राम अक्षता कलश शोभायात्रा उत्साहात

 

Kochurala-Sri-Ram-Akshata- Kalash-Procession-Enthusiasm

कोचुरला श्री राम अक्षता कलश शोभायात्रा उत्साहात

लेवाजगत न्यूज सावदा - अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलश यात्रेचे कोचूर येथे आज नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत केले.

बोरखेडे सिम हनुमान मंदिरा पासून कलश शोभा यात्रा संध्याकाळी पाच वाजता सुरुवात करण्यात आली. 

बोरखेडे सिम हनुमान मंदिरा पासून कोचूर खुर्द हनुमान मंदिर कोचुर बुद्रुक गावातून अक्षता कलश यात्रा प्रभू श्रीरामाच्या जय घोषात निघाली.यावेळी विद्यार्थी तरुणी आणि महिलांनी डोक्यावर अक्षता कलश घेऊन शोभयात्रे सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी यावेळी महिला भजन मंडळी कडून श्रीरामाचे जय घोष करून भजन गायन करण्यात आले.

   प्रभु श्रीराम लक्ष्मण सीता मातेची केली वेशभूषा अक्षता कलर्स डोक्यावर घेतलेल्या मुली पावली खेळणारी महिला भजन मंडळी श्रीराम सीतामाता व लक्ष्मण यांच्या सजीव देखाव्याने शोभायात्रा आकर्षक ठरली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.